झटपट ब्रेड उत्तम्पम
साहित्य :
७-८ ब्रेड चे स्लाइज
१/२ वाटी रवा
१/२ वाटी दही
२ कांदे ( उभे चीरून घेणे )
२ टोमेटो (उभे चीरून घेणे )
थोडी कोथिंबीर
१/४ चमचा तिखट
थोडा स चाट मसाला
चावी पुरते मिठ
२ चमचे तेल
कृती :
प्रथम एका बाउल मध्ये दही, रवा आणि मिठ एकत्र मिक्ष करून बाजूला ठेवावे .
नंतर ब्रेड चे स्लाइज घेयून त्याला वाटी चा मदतीने गोल आकार द्यावा .
कांदा,टोमाटो मध्ये मीठ,तिखट ,कोथिंबिर आणि चाट मसाला घालून मिक्ष करावे .
मग दह्याचा मिक्ष मध्ये ब्रेड चे एक स्लाइज घायून दोन्ही बाजूने घोळून घ्यावे .( मिक्षन घट्ट वाटल्यास त्यात थोडे पाणी टाकून सैल करावे ).
मग तो ब्रेड चा स्लाइज तव्यावर थोडे से तेल टाकून त्यावर ठेवावा आणि वरचा बाजूला कांदा ,टोमाटो चे मिक्षन टाकावे एका बाजूने चागले भाजून झाले का हळू दुसरी बाजू टाकावी आणि चागले खरपूस भाजून घ्यावे . आणि गरम गरम खायला द्यावे . टोमाटो सॉस किव्हा नरळा चा चटणी बरोबर छान लागते .
लहान मुलां ला त्यावर थोडे चीज घातले का खूप आवडते .
हैप्पी कुकिंग
xxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxxx
झटपट आणि पौषिक ओंत्स ढोकळा ( Oats Dhokla )
साहित्य:
१ वाटी ओंत्स, १/२ वाटी भाजलेला रवा , २-३ वाटी आंबट ताक ,
१ १/२ चमचा आले मिरची पेस्ट , १ /३ चमचा खायचा सोडा ,
१/२ चमचा मीठ ,चावी साठी साखर ,
सजा वाटी साठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खवलेल ओल खोबर .
कृती :
ओंत्स भाजून घ्यावे अमी मिकसर मध्ये भरडून घ्यावा नंतर ओंत्स आणि रवा आले मिरची पेस्ट ताका मध्ये टाकून सारखे करावे ( साधारण इडली चा पीठा सारखे झाले पाहिजे लागले तर थोडे पाणी घाला ) नंतर मीठ आणि साखर टाकून ढवळावे नंतर त्यात खायचा सोडा थकून लगेच च ढोकळा स्टेड मध्ये टाकून वाफवायला ठेवावे १२ मि ने गेस बंद करावा थोड गार झाले की सुरी ने वड्या कापाव्या. वरतून खोबर व कोथिंबीर टाकावी
( आवडत असल्यास वरतून मोहरी आणि कडी पत्ता घालून फोडणी करून घालावी )
हैप्पी कुकिंग


No comments:
Post a Comment